सो आज ब्लॉग वरचा  पहिला दिवस आहे, म्हणजे  खूप दिवस झाले परत ब्लॉग वर काही पोस्ट करू लागलोय, आणि आपण तो वाचत  आहात हे पाहून बर  वाटलं. हे सर्व लिहणं  हे  माझ्यासाठी  खरंच आनंददायी अनुभव आहे  कारण यामुळे मी माझ्याशी कनेक्ट होतोय. हे लिखाण यात सर्व आहे. मनातली घालमेल ,डोक्यात असलेल्या  कल्पना  आणि  गोष्टींचे ,खेळ  आहेत . बस जस मनात येईल तस या व्यासपीठावर उमटवत जायचं एवढाच हा खटाटोप  आहे  .बरं  हा लेखन प्रपंच तरी कशासाठी तर स्वतःला आजमावण्यासाठी. बरेच दिवस मनात येत होत कि लिहल पाहिजे लिहल पहिजे. लिहण  हि माझी आवड आहे काय माहित एक दिवशी ती माझी निवड हि असू शकेल.
आयुष्य खूप धावपळीचं बनत चाललं आहे लोक हल्ली स्वतःला खूप कमी वेळ देत आहेत,खरी सुखाची कल्पना हे विसरले आहेत. मुंबई मला याच कारणासाठी आवडत नाही करणं हि स्वप्न नागरी भलेही  असेल पण सुख नगरी नक्कीच नाही. मुंबई ला पहाटेच्या लोकल मधेही लोक कानाला हेडफोन लावून टिकटॉक पबजी खेळात गुंतलेली देशाची भाग्यविधाता  पिढी पहिली तर विषन्न  वाटत.बरं  असा करण्यात त्यांना किती समाधान मिळत असावं तर शून्य.,समाधान किती आहे तर क्षणिक .मनाला निरागस आनंद देणार काम तेच जे हल्ली आपण विचार करतो आणि  झोपी जातो.  हे स्वप्न जगायचं कधी हेच विसरून जातो  आणि  विचार केला असेल का हा वेळ स्वतःसाठी वापरावा. हल्ली तरुण  पिढी मोबाइल मध्ये गुंतली आहेत, देवाच्या दरबारात जाऊन दर्शन घेल्याला ५ मिनिटेही झाली नसतील तोपर्यंत नोटिफिकेशन  पाहण्याची घाई झालेली असते. बरं  आपण मंदिरात का जातो हेही नेमके माणसांना उमगत नाही. असो तो वेगळा विषय आहे.हल्ली  सगळ्या गोष्टी कश्या आता कॅजुअलं झाल्या आहेत. 

हे २१ दिवस स्वताला  देणे हा माझ्या मनाचा आंतरकौल आहे म्हणायला हरकत नाही. वेगवेगळे विषय हाताळणे, त्यात झोकून देऊन लिहणे. हि भलेली अवघड वाटणाऱ्या मोहिमेवर सध्या मी आहे बघू कास जुळतंय भेटूयात पुन्हा नव्याने एका नवीन भागासह . LOVE  अँड PEACE ..... 

0 comments:

Powered by Blogger.