का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे,
उमलती जशा धुंद भावना,अल्लड वाटे कसे,
बंध जुळती हे प्रितीचे,
गोड नाते हे जन्मांतरीचे.
ऑफिसमध्ये खुर्चीवर
रेलून काचेतून बाहेर पडणारा पाऊस पाहताना नकळतपणे ओठी गाणं आलं. उन्हाळ्यातला कोरडेपणा
सोसलेल्या धरणीला पाऊसाच्या थेंबाची लागलेली आसं ही पावसाच्या पहिल्या थेंबाबरोबर नाहीशी
होते आणि सुरु होतो पावसाचा तो लयबद्ध नृत्याविष्कार… सरीवर पडणा-या सरी, मातीचा तो
सुटलेला हवाहवासा सुगंध. वा-याने पानांची होणारी सळसळं. पाण्याचे वाहणारे पाट. सगळं
कसं क्षणातं बदलतं. मुळात पाऊसं हा ॠतुचं भुतकाळी असावा.मनात आनंद फुलवणारा,चैतन्य
निर्माण करणारा, आणि हळूचं भूतकाळात शिरून जुन्या जखमांवरची खपली काढणारा,सगळंच कसं
जमत बुवा या पावसाला..
ऑफिस बाहेर पडणारी
ती रिमझिम पाहून भूतकाळातली पाने फडफड करीत उडु लागली.बालपणी केलेला दंगा,मुद्दामहून
आजारी पडून शाळेला मारलेली दांडी, पावसाळ्यात गळणारे ते मराठी शाळेतले छप्परं. सारे
काही डोळ्यापुढे नाचू लागले.जगताप बाई वर्गातून गेल्यावर वर्ग बंद करुन केलेल्या त्या अंधारातल्या
मारामा-या, पावसातं खेळलेल्या सूरफाट्या, पावसात भिजलो म्हणून खाल्लेला तो वडिलांचा
मारं,आई स्वयंपाक करताना चुलीपुढे शेकलेले ते हात. धो-धो पावसाने होणा-या त्या काळोख्या
अंधारास घाबरून आईला मारलेली मिठी. सगळं कसं लख्खं आठवतयं अजून..
पुढे हायस्कूलला गेल्यावर
त्या आठवणी निघतं त्यालाही पावसाचीचं सादं… सहावीचा तो वर्ग इतर वर्गापासून लांब होता.
त्याची नवीन कौलारे उचकटून टाकणा-या गव्हाणेला कोणं विसरेलं..? वर्गातली ती उर्जाराणीची
कथा वाचताना त्या उर्जाराणीच्या तेजस्वी चेह-याकडे पाहून लागलेली ती प्रेमाची पहिली
चाहूलं ती विसरावी कशी.? पोरकट प्रेम म्हणावं की प्रेमाचा पहिला अध्यायं….
प्रेम आणि पावसाचं
अस काही कनेक्शन आहे की जल बिन मछली, नृत्य बिन बिजली. दोघेही एकमेकांशिवाय पुर्ण नाही.प्रेमाला
येणा-या बहराला पावसामूळेच खरी शोभा आहे. वेळेनुसार प्रेमाची व्याख्या बदलते पणं बदलत
नाही तो पाऊसं.ख्ररंच पावसाळ्यातल्या आठवणी कश्या घट्ट असतात.त्याचे रेशीम बंध कधीही
तुटतं नाहीत. त्या रेशीम बंधात अश्या काही गोड,आंबट,काही भावनिक आठवणी असतात की त्यांचा
जेवढा गुंतढा होईल तेवढ्याच त्या तेवढ्याच ब-या वाटतात. मग त्यात कॉलेजच्या पहिल्या
प्रेमाचा सुगंध असतो वा मित्राच्या टोळक्यात केलेल्या भटकंत्या असतात.
0 comments:
Post a Comment